मनोरंजन

“मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय, तिथं देवी जागृत आहे”; मराठी दिग्दर्शकाच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई | न्यूझीलंड या देशानं कोरोनाच्या काळात कमाल करून दाखवली आहे. मागील 100 दिवसात एकही कोरोना रूग्ण आढळून न आल्यानं आता न्युझीलंडवर कौतुकाचा वर्षाव होतोय. महिला पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झाल्याचं बोललं जातंय. याच घटनेचा हवाला देत दिग्दर्शक केदार शिंदे यानं जॅसिंडा यांच कौतुक करताना दुसरीकडे मोदी सरकारवर केलेल्या टीकेनं आता एकट खळबळ माजली आहे.

ट्विटरवर केदार शिंदे म्हणाले की, मला न्युझीलंडला जाऊन राहायचंय. या 100 दिवसात तिथं एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. महिला पंतप्रधान आहे. तिथं देवी जागृत आहे. आपण इथं फक्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा फतवाच काढणार… केदार शिंदेच्या या ट्विटनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यांच्या या वक्तव्यानं त्यांना बरचसं ट्रोलही करण्यात आलं.

 

केदार शिंदे यांनीही टीका करत असलेल्यांना लागलीच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले की, “काही लोकांच्या मेंदूचा केमिकल लोच्या झालाय. व्यंगात्मक लिखाण, तिरकसपणा याविषयी त्यांना काहीच माहीती नसावं. एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल अशा व्यक्ती आपल्या बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला फुकटचा मोबाईल डाटा, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात.”

दरम्यान जॅसिंडा यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्युझीलंडमध्ये कडक लाॅकडाऊनचे आदेश लागू केले होते. या कडक लाॅकडाऊनचा परिणाम म्हणजे मागील 3 महिन्यांच्या काळात न्यूझीलंडमधील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

‘त्या’ मुलाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च पार्थ पवारांनी उचलला; सोबतच दिली कौतुकाची थाप!

“…आता कसे थंड पडले आहेत बघा, ही नकली शिवभक्ती काय कामाची”

‘एका तासाच्या आत मोदींना ठार करेन’, एका फोन कॉलनं बसला पोलिसांना हादरा अन

आश्चर्यम! ‘या’ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी आता घेतलं अकरावीत अ‌ॅडमीशन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या