मनोरंजन

टीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका; केदार शिंदेंचं बिचुकलेवर टीकास्त्र

मुंबई | अभिनेता अभिजीत बिचुकले याला काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात रहायला खूप आवडतं. त्याच्या वागण्यामुळे देखील तो कायम चर्चेत असतो किंबहुना त्याच्या वागण्यावरून आणि त्याच्या बोलण्यावरून तो अनेक जणांच्या निशाण्यावर असतो. त्याच्यावर असाच निशाणा साधलाय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी!

अभिजीत बिचुकलेला कलर्स मराठी या वाहिनीवर 2 स्पेशल या कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. तो भागही प्रसारित झाला आहे. यावरच अपेक्षा वाढवून मातीमोल ठरवणं म्हणजे स्पेशल दोन…  कलर्स मराठी असं वागू नका…  टीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका, असा सल्ला केदार शिंदेंनी वाहिनीला दिला आहे.

जितेंद्र जोशीच्यासमोर कुणालाही बसवू नका, अशा कडक शब्दात त्यांनी अभिजीत बिचुकले याच्या चमकोगिरीवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, दोन आठवडे प्रगल्भ तरीही मनोरंजक दिल्यावर हे असं पाहायचं… लोकहो… काय म्हणणं आहे… असं ट्वीट केदार शिंदे यांनी केलं आहे. केदार शिंदे यांची मराठी चित्रपटसृष्टीत परखड, सुस्पष्ट आणि निर्भीडपणे भाष्य करणारे म्हणून ओळख आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या