खेळ देश

‘भरल्या डोळ्यांनी तुझा हेल्मेटमधला चेहरा पाहिला की…’, या खेळाडूने धोनीला लिहीलं मराठीतून पत्र!

पुणे | काहीच सुचलं नाही तेव्हा डोक्यात आलं, तुम्हाला पत्र लिहावं. माझ्यासकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे ते सांगावं, अशा शब्दात केदार जाधवनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. केदारनं वाढदिवसाच्या दिवशी चक्क मराठीतून पत्र लिहीत धोनीला वाढदिवसाचं आगळंवेगळ गिफ्ट दिलं आहे.

केदार लिहीतो की, माझ्यासकट सगळ्या देशाला तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना पहायचंय. तुम्ही नेहमीसारखी झोकात मॅच फिनिश करून पॅव्हेलियनकडे यालं. आम्ही भरल्या डोळ्यांनी तुमचा हसरा चेहरा डोळ्यात साठवू आणि सगळ्यांच्या मनात तेव्हा एकच गाणं वाजत असेल ‘अभि ना जाओ झोडकर ये दिलं अभी भरा नही’.

 

कॅप्टन कूल धोनी आज ३९ व्या वर्षात पदार्पण करतोय. धोनी कॅप्टन असताना केदारनं नुकतंच क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. धोनीने केदारला कायमच साथ दिली. एवढंच नव्हे तर दोघांमध्ये एक आगळावेगळा ॠणानुबंध तयार झाला.

आपल्या खास मित्रासाठी पुणेकर केदारनं चक्क मराठीतून पत्र लिहीण्याचं ठरवलं. केदारनं धोनीच्या मैत्रीविषयीचा भावनिक उलगडा या पत्रातून केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचं हे पत्र चांगलच व्हायरल होतं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आनंदाची बातमी…. गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी- राजेश टोपे

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महत्वाच्या बातम्या-

शाब्बास रे पठ्ठ्या! तरूण व्यापाऱ्यानं तोडला चीनसोबतचा तब्बल साडेचार कोटींचा करार…

“भाजपवाल्यांनो तुम्ही राणेसाहेबांचा खांदा का वापरता? खुलेआम तुमची मन की बात सांगा की …”

चिंता वाढली, भारताने कोरोनारूग्णांचा सात लाखांचा टप्पा ओलांडला, गेल्या 24 तासांत….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या