ली़ड्स | नुकत्याच झालेल्या टी-20 सामन्यात के. एल. राहुलला संघाबाहेर ठेवल्यानं भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण कर्णधार विराट कोहलीवर नाराज झाला आहे. या पराभवानंतर विराटच्या काही निर्णयांवर टीका होत आहे.
लोकेश राहुलसारख्या तरुण खेळाडूला संधी द्यायला हवी होती. त्याला संघाबाहेर बसवणं योग्य नाही. त्याच्यासोबत जो प्रकार घडला त्याच्यामुळे मी नाराज झालो आहे. तो फक्त एका सामन्यात अपयशी ठरला होता, असं लक्ष्मण म्हणाला.
के. एल. राहुल हा टी-20 सामन्यात फाॅर्ममध्ये होता, तरी त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संघात संधी मिळाली. नेटकऱ्यांकडूनही विराटच्या या निर्णयावर टीका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा
-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे
-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी
-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
Comments are closed.