बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेतील ‘या’ नेत्यांवर नजर ठेवा”; भरसभेत राणेंचा उद्धव ठाकरेंना खळबळजनक सल्ला

सिंधुदुर्ग | राज्यातील सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यादांच समोरासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. नारायण राणे यांनी बोलताना म्हणाले की, या विमानतळाचे पूर्ण श्रेय हे आपलाच असल्याचं बोलून दाखवलं आहे.

उद्घाटनाच्या या कार्यक्रमात राणेंनी बोलताना मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार केली आहे. उद्धवजी, तुम्हाला तुमचे प्रतिनिधी तुम्हाला चुकीची माहिती ब्रिफींग करत आहेत. त्या माहितीमध्ये काहीच तथ्य नाही. तसेच तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात, याची गुप्तपणे माहिती घ्या, असा सल्ला राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

बाळासाहेबांनी खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. बाळासाहेबांनी खोट्यांना कधीही थारा दिला नाही. वाईट बुद्धीने बोलायचं आणि यायचं हे काही चांगलं नाही. चांगल्या मनाने तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करू, असं नारायण राणे बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान,  माझ्या आयुष्यातील हा अत्यंत चांगला क्षण आहे. अशा ठिकाणी राजकारण करू नये, असं वाटतं. त्यासाठीच मी आज येथे आलो आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री भेटले. ते काहीतरी बोलले ते माझ्या कानावर आले. मी एक शब्द ऐकला, असा राणेंनी बोलताना म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्यात”; पहिल्याच वाक्यात ठाकरेंचा प्रहार

“नजर लागू नये म्हणून काळं तीट लावावं लागतं, ती लावणारी लोकं इथं आहेत”

“लघू-सूक्ष्म का असेना तुमच्याकडे मोठं खातं”; उद्धव ठाकरेंकडून राणेंना कानपिचक्या

“खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी बाहेर काढलं होतं”; राणेंच्या ‘त्या’ वाक्याचा फडशा!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More