बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

मुंबई | मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर टेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आपात्कालीन विभागातील अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल याबाबत सविस्तर सांगितलं.

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. ही परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलवली.

मुंबईत शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. तर दुसरीकडे संरक्षत भिंत घरांवर कोसळली. पावसामुळे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. यावरून विरोधकांनी महापालिकेवर सडकून टीका केली.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More