बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान
मुंबई | आजकाल सगळ्यांचेच कोणत्याना कोणत्या तरी बॅंकेत खाते(Bank Account) असते. परंतु बॅंकेत खाते उघडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बॅंकेत बचत खाते(Saving Account) उघडताना लक्षात ठेवल्या पाहीजेत.
प्रत्येकाचे खाते वेगवगेळ्या बॅंकेत असते. बॅंकेत बचत खाते उघडत असताना त्या बॅंकेचा व्याजदर(Interest Rate) किती आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जास्त व्याजदार असलेल्या बॅंकेत तुम्हाला जास्त व्याजदर मिळाल्यानं तुमचा फायदा होऊ शकतो.
काही बॅंका चेकबुक, एटीएमशिवाय अनेक प्रकारचे मासिक शुल्क ठेवतात. त्यामुळं अशा बॅंकांमध्ये खाते उघडणं टाळलं तर तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
काही बॅंकांमध्ये बचत खाते उघडताना त्यामध्ये थोडी रक्कम ठेवणं गरजेचं असतं. पण जर तुमच्या खात्यात पैसे नसले तर काही बॅंका यासाठी दंड घेतात. त्यामुळं खाते उघडतानाच अशी बॅंका निवडा जी खात्यात शून्य रूपये असतानाही दंड घेणार नाही.
काही बॅंका चेकबुकसाठी, एटीएमसाठी(ATM) पैसे घेतात. त्यामुळं जर तुम्ही या सेवा मोफत देणाऱ्या बॅंकेत खाते उघडले तर पैशांची बचत होऊ शकते.
दरम्यान, ज्या बॅंकेत तुम्ही खाते चालू करत आहात, त्या बॅंकेचे नियम जाणून घ्या. जर तुम्ही नियम न लक्षात घेता खाते चालू केले तर ते तुम्हाला महागातही पडू शकते.
महत्वाच्या बातम्या-
- iPhone वापरणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज!
- मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
- ‘या’ टीप्स फाॅलो केल्या तर हिवाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून होऊ शकतो बचाव
- मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा, म्हणाले…
- अखेर गोपीला मिळाला खऱ्या आयुष्यातला एहम
Comments are closed.