भाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करतात; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खळबळजनक ट्वीट केलं आहे. भाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करून संबंध भारतभर फिरत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी अॅपलच्या एरिया मॅनेजरला गोळी झाडून मारलं होतं. त्यामुळे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

केजरीवाल यांनी ”विवेक तिवारी तर हिंदू होता, मग त्याला का मारलं? भाजपचे नेते तर सगळ्या देशात हिंदू तरुणींवर बलात्कार करतात. आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करा. भाजप हिंदुच्या हितासाठी नाहीये. सत्तेसाठी जर त्यांना हिंदुंना मारावं लागलं तर ते दोन मिनिटं सुद्धा विचार करणार नाहीत” असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-पवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं

-हरामांचं राज्य असताना ‘रावण’ लिहिला- ज्ञानेश महाराव

प्रकाश आंबेडकरांना MIM चालतो, मग RPI चे इतर गट का चालत नाहीत?

-छगन भुजबळांच्या समता सभेत जोरदार गोंधळ!

-गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी; राऊतांचा पवारांना टोला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या