सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवालांनी २ कोटी रुपये घेतले!

नवी दिल्ली |  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून २ कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केलाय. ही रक्कम दिल्याचं आपण स्वतः पाहिल्याचंही मिश्रा यांनी म्हटलंय. 

50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे दिल्लीत एकच खळबळ उडालीय. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या