Top News

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

गुजरात | गुजरातमधील राजकोटमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आलीये. 3 भावा-बहिणींनी स्वतःला जवळपास 10 वर्ष एका बंद खोलीमध्यै कैद करून ठेवलं होतं. या तीन भावा बहिणींचं वय 30 ते 42 वर्षांच्या दरम्यान आहे. बेघरांसाठी काम करणाऱ्या साथी सेवा ग्रुपच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या संस्थेच्या मदतीने या तिघांची सुटका करण्यात आली.

या संस्थेचे अधिकारी जालपा पटेल यांच्या सांगण्यानुसार, “संघटनेच्या सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा खोलीत थोडाही प्रकाश नव्हता. खोली उघडताच शिळ्या अन्नाचा आणि मानवी विष्ठेचा दुर्गंध येत होता. अमरीश, भावेश आणि मेघना अशी या तिघांची नाव असून त्यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी खोलीमध्ये बंद करुन घेतलं होतं.”

ते पुढे म्हणाले, “त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी खोलीत बंद करून घेतलं. संस्थेच्या सदस्यांनी त्यांना बाहेर काढलं असून त्यांची पद्धतीने साफसफाई करण्यात आलीये. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.”

या तिघांच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, “मोठा मुलगा वकिली करायचा तर मुलगी मेघना हिने मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीये. याशिवाय लहान मुलाने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलीये. आईच्या निधनामुळे त्यांना मानसिक धक्का बसला अन् त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं.”

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

दहावी पास तरुणांना पोस्टात काम करण्याची संधी; पाहा कसा कराल अर्ज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या