बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केरळ पोलिसांनी कोरोनाची जनजागृती करण्यासाठी केला चक्क डान्स; पाहा व्हिडीओ

केरळ| कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सरकारी आणि खासगी स्तरातून जनजागृतीचे काम सुरू आहे. केरळ पोलिसांनी चक्क डान्स करून कोरोनाबद्दल जनजागृती केली आहे. केरळ पोलिसांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

कोरोना टाळण्यासाठी गर्दी करू नका, स्वच्छता राखा तसंच हात स्वच्छ धुवा असं सांगण्यात येत आहे. या सगळ्यांत हात स्वच्छ धुणे ही फार महत्वाची बाब आहे. केरळ पोलिसांनी अनोखा डान्स करून हात धुण्याचं महत्त्व सांगितलं आहे

देशातील कोरोना रूग्णांची संख्या 130च्या वर गेली असून. कोरोनामुळं देशभरात 3 जणांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केंद्र तसंच राज्यसरकारनं जनतेला केलं आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळं भितीचं वातावरण आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

घाबरू नका, सावध राहा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता दीदींचा सल्ला

लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचं जनतेला आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More