Top News महाराष्ट्र मुंबई

देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार

मुंबई | सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर देशातील सर्वात तरूण महापौर हा रेकॉर्ड होता. मात्र त्यांचा हा रेकॉर्ड एक तरूणी मोडणार आहे.

केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे.

आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य आहेत. ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहेत. इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत.

दरम्यान, 1997  साली देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यासोबतच फडणवीस वयाच्या 21 व्या वर्षी राम नगर वार्डातून नगरसेवक झाले होते. मात्र त्यांचा 23 वर्षाचा रेकॉर्ड आर्या राजेंद्रन तोडणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार’; भातखळकरांची जहरी टीका

मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली

ग्रामपंचायत सदस्यासाठी आता शिक्षणाची अट; नव्या जीआरनं अनेकांना मोठा झटका!

अंकिता लोखंडेनं बाॅयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला; खाली कमेंटचा पाऊस पडला!

‘सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही’; सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रीतम मुंडेंचं प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या