Top News देश

…त्यांनी बिबट्यालाही सोडलं नाही; शिजवून खाल्लं!

केरळ | माणूस ही आता किती हिंस्र बनत चालला आहे हे केरळमध्ये घडलेल्या प्रकारावरून लक्षात येईल. समाजकंटकांनी 50किलोच्या बिबट्याला ठार करत त्याचं मांस शिजवून खाल्लं आहे.

केरळमधील इडुकी गावात हा प्रकरा घडला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला बिबट्या अडकला या बहाद्दरांनी वन विभागाला माहिती न देता जंगी पार्टीचा बेत आखला.

विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावं आहेत. यामधील विनोदच्या शेतामधील जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं.

दरम्यान, विनोदच्या घरातून 10 किलो मांस आणि बिबट्याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. बिबट्याची नखं, दात आणि कातडं विकण्याची या सर्व आरोपींची योजना होती.

थोडक्यात बातम्या- 

फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही- व्यंकय्या नायडू

‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

अनैतिक संबंधांमध्ये पैसा ठरला वरचड; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!

सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या