देश

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. त्या हत्तीणीच्या तोंडात अननसमधील फटाके फुटले आणि तिच्या गर्भात असलेल्या पिल्लूचा मृत्यू झाला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ही दुर्दैवी घटना पुढे आली. यानंतर या हत्तीणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना मलप्पुरम जिल्ह्यात घडली. इथे ही हत्तीणी अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर आली आणि ती गावात भरकटली. या गावातील काही स्थानिकांनी तिला अननसमध्ये फटाके भरुन खाऊ घातलं.

या घटनेत हत्तीणी मोठ्या प्रमाणात जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक हत्तीणीला घ्यायला गेली. मात्र काही वेळातच या हत्तीणीने आपले प्राण सोडले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

महत्वाच्या बातम्या-

“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या