बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरसबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी पोलिसांनी धरला ठेका, पाहा व्हिडीओ

तिरुअनंतपुरम | देशात कोरोनाचा प्रसार प्रचंड वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्यांसोबत मृतांची संख्या देखील प्रचंड वाढत आहे. वारंवार सांगून  देखील लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अनेक लोक घराबाहेर निघताना मास्कचा वापर करत नाहीत. तर अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच केरळ पोलिसांनी अतिशय हटके पद्धतीने जनजागृती केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेकादा या नियमांचं उल्लंघन होताना पाहायला मिळते. केंद्र सरकारने जनजागृती करुन देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. घरातून बाहेर पडल्यावर बऱ्याचदा विचित्र कारण दिल्याचं देखील समोर आलं आहे.

नियम न पाळणाऱ्यांसाठी केरळ पोलिसांनी एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डान्सद्वारे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे. मास्क लावणं, सॅनिटाईजरचा वापर करणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं, अशा अनेक नियमांचा उल्लेख या व्हिडीओमध्ये केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ फेसबुक वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. केरळ पोलिसांच्या या कामगिरीसाठी अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच या व्हिडीओवर लोकांच्या भरभरुन कमेंट्स येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

रणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More