बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वाभिमानी महिलेवर बलात्कार झाला तर ती जीव देईल; काँग्रेसच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

केरळ | देशात महिलांवरील अत्याचार काही प्रमाणात वाढलेत. अशा परिस्थितीत केरळमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे संताप व्यक्त केला जातोय.

केरळमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी बलात्कार पीडित महिलांसंदर्भात हे विधान केलं आहे. एखाद्या स्वाभिमानी महिलेवर बलात्कार झाला तर ती जीव देईल, असं वक्तव्य रामचंद्रन यांनी केलंय.

सरकारविरोधात आंदोलन करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, रोज सकाळी ती महिला उठून दावा करते माझ्यासोबत बलात्कार झालाय. या महिलेला पुढे करून मुख्यमंत्री राजकारण करतायत. मात्र हे ब्लॅकमेल करणारं राजकारण या ठिकाणी चालणार नाही.

ते पुढे म्हणाले, जर कोणी महिला एकदा सांगत असेल की तिच्यावर बलात्कार झालाय तर आम्ही समजू शकतो. मात्र स्वाभिमानी महिलेवर जर बलात्कार झाला तर जीव देईल. देहविक्री करणाऱ्या महिलेला पुढे करून तुम्ही आरोप करत असाल तर जनता ते ऐकणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीला मागे टाकत दिनेश कार्तिकची नव्या विक्रमाला गवसणी

“गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमीपूजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?”

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

चेन्नईनं केली अशी करामत की पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर!

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More