देश

हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला

नवी दिल्ली | महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार अलीगड मध्ये घडला होता. या प्रकरणाचा बदला म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाईटचं केरला सायबर वॉरिअर्सनं हॅक केली आहे.

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारांना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी केरला सायबर वॉरिअर्सनं केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन व्हीडिओ शेअर केला आहे.

महात्मा गांधी हे जगभरातील लोकांसाठी नेहमीच सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणादायी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, http://www.abhm.org.in या वेबसाईटवर हिंदू महासभा मुर्दाबाद, असं केरला सायबर वॉरिअर्सनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय ‘भावना’ कसं आहे?, पाहा मोदींच्या प्रश्नावर काय म्हणाल्या शिवसेना खासदार…

स्मारक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे छापे; मायावतींच्या अडचणीत वाढ?

महाराष्ट्राला ‘नवे योगी’ मिळाले आहेत- मनसे

‘हिटलर’ 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब?- राहुल गांधी

…तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं ‘गणित’ फिस्कटणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या