पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद

श्रीनगर | पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र केशव गोसावी यांना वीरमरण आलं आहे. नौशेरा सेक्टरमध्ये रविवारी दुपारी पावणेतीनच्या वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. 

पाकिस्तानच्या गोळीबारात केशव गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.

दरम्यान, शहीद केशव गोसावी हे अवघ्या 29 वर्षांचे होते. नाशिकच्या श्रीरामपूर गावचे ते रहिवाशी होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं गावात शोककळा पसरली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

-शेवटच्या चेंडूवर भारताचा अत्यंत थरारक विजय

-नेता असावा तर असा! 21 कार्यकर्त्यांना फुकट वाटल्या दुचाकी

-शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी

-दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही; उर्जामंत्र्यांची घोषणा