बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें”

मुंबई | तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा, असं ट्विट करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

राऊतांनी टोला लगावल्यानंतर भाजपनेही आता पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना शायरीच्या माध्यमातून काही प्रश्न विचारलेत. ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’ असे सवाल त्यांनी केलेत.

बिलकुल तू इधर उधर कि न बात कर. ये बता कि सचिन वाजे को किसने लिया।, किसानोको मदद क्यो नही दि!, शिवाजी महाराज के प्रतिमा के पास खडे होनेवाले परभणी एनसीपी विधायक पर कारवाई क्यो नही! और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा”

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More