मुंबई | शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागत असल्याचं म्हणत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा 5 जुलै 2017, 7 ऑगस्ट 2018, 22 नोव्हेंबर 2011 मध्ये तीन पत्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असं महापालिकेला पाठवला. मात्र त्यावेळी शिवसेना नेत्यांनी प्रस्ताव देऊ नका अस बजावलं असल्याचं उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, केशव उपाध्ये यांनी 1995 मध्ये औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामंतर करण्याचा प्रस्ताव आला असल्याचं सांगितलं. त्यानंतर कशाप्रकारे हा प्रस्ताव फेटाळलं असल्याचं परिषदेत सविस्तरपणे सांगितलं.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद https://t.co/l6Bw78kptD
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2021
थोडक्यात बातम्या-
ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!
“शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा!”
शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय
2 वर्षाखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरु
बापमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला पाहण्यासाठी 83 वर्षाचे टाटा मुंबईहून पुण्याला