बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

मुंबई |  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते निलेश राणे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझं कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तर भाजपचं ऑपरेशन लोटस कधीच पुर्ण होणार नाही, असं देखील म्हटलं आहे. यावर आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

दर आठवड्याला सत्ताधारी महावसुली आघाडीतील तीन पक्षापैकी कोण ना कोण येतो आणि एकच वाक्य बोलत रहातो, ‘ॲापरेशन लोटस होणारं नाही’. आता हेच वाक्य उदय सामंत म्हणत आहेत. खरतर हे सरकार स्वतःच्या अंतर्गत विरोधातूनच जाणार आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपने ॲापरेशनचा कधीच दावा केला नाही तरी एवढी धास्ती का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी निलेश राणे यांच्यावर नाव न घेता परखड टीका केली आहे. त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असं देखील म्हटलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली पण ती गुप्तपणे झाली नाही. तर 200 माणसांसमोर भेट झाली, असं देखील सावंत म्हणाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षांवरून प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. त्याचसंदर्भात भाजपचे केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली होती. तर विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये, असा सल्ला देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिला होता.

थोडक्यात बातम्या-

लग्नाचा पहिला वाढदिवस, पत्नीने सांगितलं पार्लरला जायचं अन् त्यानंतर घडला ‘हा’ प्रकार

‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली पण…’ निलेश राणे यांच्या आरोपावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण

चिमुकल्याचे प्राण वाचवणं होतं अशक्य; 16 कोटीच्या इंजेक्शनसाठी विरूष्कासह इतर कलाकारांनीही घेतला पुढाकार

“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”

5 रूपयांचा एक समोसा मग 4 कितीचे?; लहान मुलाच्या निरागस युक्तीवादाचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More