बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी”

मुंबई | महाराष्ट्रात केवळ मुख्यमंत्रीपद शिवसेनेचं (Shivsena) आहे. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील जास्त अधिकार राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना आहेत. त्यात भाजपविरोधात केवळ शिवसेनाच आक्रमक भूमिका घेत असून राष्ट्रवादीची भूमिका मवाळ आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा (Congress) राष्ट्रवादीचं वर्चस्व जास्त असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. हाच मुद्दा लावून धरत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी चालला आहे. माझे कुटुंब (मुलगा, मेव्हुणा) माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी, असा घणाघात केशव उपाध्येंनी केला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झाली असल्याची खोचक टीका देखील उपाध्येंनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना आमदारांना कोणी विचारत नाही. उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, गृहनिर्माणसारखी खाती असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय. जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार?, असा सवाल देखील उपाध्येंनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

Sharad Pawar: UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, रोहित पवार म्हणाले…

Narendra Modi: पंतप्रधान मोदी सर्वांत शक्तिशाली भारतीय; वाचा दुसऱ्या क्रमांकावर कोण?

मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता मास्क सक्तीही नाही

“तुमचे निर्बंध घाला चुलीत, हिंदू सणांवर बंधनं लादू नका”

नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! आता ईडीचं पथक नाशकात धडकलं, चौकशी सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More