बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लाडक्या आर्यनला बेल मिळाला, आता जनतेच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेणार का?”

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु असलेलं प्रकरण म्हणजेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरण या प्रकरणात कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीत झालेल्या कारवाईवरून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी या कारवाईबाबत अनेक मोठे खुलासे केले.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर काल जामीन मंजूर झाला पण त्यानंतर भाजपने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला आहे’, असा टोला ट्विटरवरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी लगावला  आहे.

दरम्यान, आतातरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ मिळेल का? आणि आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या गोंधळाने हताश झालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहणार का?’, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकारवर केशव उपाध्ये यांनी जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

‘महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यांना दिलासा मिळणार का?’, असं म्हणत संजय राऊत आणि नवाब मलिक आपण आता जनतेच्या प्रश्नावर कधीतरी पत्रकार परिषद घेणार का?, असा खोचक प्रश्नही केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.

 

थोडक्यात बातम्या

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More