बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले”

मुंबई | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या एनडीएने अधिक जागांवर आघाडी घेतलीये.

एनडीए सत्तेत येण्याची चिन्ह दिसत असताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले असल्याचं विधान उपाध्ये यांनी केलंय.

केशव उपाध्ये ट्विट करत म्हणाले, “राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत झाली. डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव”

कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक मानली जातेय. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं असून नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार का हे आज स्पष्ट होणारे.

महत्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”

बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More