बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारतर्फे लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच हा बंद पुर्णपणे राजकीय स्वार्थासाठी करण्यात येत असून या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करतंय, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये यांनी आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदची निंदा करत गंभीर प्रकरणावरून जनतेचंं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे हीन पातळीचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. तसेच लखीमपूरच्या घटनेची चर्चा करूच पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा प्रश्नही त्यांंनी या माध्यमातून उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी हा राज्य सरकारच्या मदतीची वाट पाहत असताना मात्र शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. तसेच आयकर विभागाला 1050 कोटींचे पुरावे सापडल्याने जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सध्या लखीमपूर घटनेवरून राजकीय वर्तुळात मात्र भाजप विरूद्ध सर्वच विरोधी पक्ष असा सामना रंगत असताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची हत्या झाली असताना यावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप जरी होत असेल तरी या प्रकरणात पुढे आणखी काय होणार? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

कोहलीने धोनीसाठी केलेल्या ‘या’ ट्विटची सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

”प्रियंका गांधीला झाडू मारावी लागली त्यात महाविकास आघाडीला वाईट वाटायचं कारण काय?”

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More