मुंबई | 21 मे रोजी राज्यात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. काँग्रेसने एक ऐवजी दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोध निवडणूक होण्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. याचमुळे शिवसेना नाराज असल्याचं कळतंय. या साऱ्या प्रकरणावर भाजपने जोरदार टीका केली आहे.
एकीकडे राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. राज्यात कोरोनाग्रस्तांनी 20 हजार हजारांचा टप्पा पार केलाय. आणि सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
राज्यात 20 हजारचा आकडा कोरोनाग्रस्तांनी गाठतोय. पोलिसांतील बाधितांची संख्या मोठी आहे. मृतदेहाशेजारी उपचार करावे अशी संतापजनक परिस्थिती आहे. मात्र राज्यातील 3 सत्ताधारी पक्ष कुरघोडीच्या राजकारणातच मग्न आहेत. आधी आमदार… कस होणारं …आता कुणाचे किती होणारं? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपने 4 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, उमेदवार देणार आहे. आधीच्या रणनितीनुसार काँग्रेस एकच उमेदवार देणार होता. मात्र काँग्रेसने आता 2 उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना रिंगणात उतरवलं आहे.
राज्यात २० हजारचा आकडा #corona ग्रस्तांचा गाठतोय. पोलिसांतील बांघितांची संख्या मोठी आहे. मृतदेहाशेजारी उपचार करावे अशी संतापजनक परिस्थिती आहे. मात्र राज्यातील ३ सत्ताधारी पक्ष कुरघोडीच्या राजकारणातच मग्न आहेत. आधी आमदार कस होणारं आता कुणाचे किती होणारं…#mantrimastjantatrast pic.twitter.com/4vQKmY6cjk
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
दुकानं तसंच बांधकाम व्यवसाय सुरू करा; तज्ज्ञांच्या समितीचा अजित पवारांकडे अहवाल सुपूर्द
…पण अर्थव्यवस्था देखील पहावी लागेल, लॉकडाऊनवर गडकरींचं रोखठोक मत
महत्वाच्या बातम्या-
राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!
मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या चोवीस तासांत मिळाले तब्बल एवढे रूग्ण
अजानसाठी लाऊड स्पीकरचा होणारा वापर बंद करावा; जावेद अख्तर यांची मागणी
Comments are closed.