Top News महाराष्ट्र मुंबई

‘सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण…’; भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई | ईडीमुळे सेना-भाजपमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीकेचे बाण सोडले. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जात असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील 22 आमदारांनाही धमकावलं जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी केला होता.

 

थोडक्यात बातम्या-

“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”

कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..

‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!

वयाच्या अवघ्या 17 वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने केला भाजपमध्ये प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या