बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत”

मुंबई | देशात खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याबबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खतांच्या किमती कमी करण्याबाबत केंद्रीय मंत्री सदानंद गौरा यांना पत्र लिहिलं होतं. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहीणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालिन कृषीमंत्री असणाऱ्या शरद पवार आणि यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारं जावं लागलं असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

युपीए सरकारच्या काळात ज्यात शरद पवार कृषीमंत्री होते. त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी 1 एप्रिल 2010 पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावं आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरवण्याची मोकळीक द्यावं असं धोरण लागू झालं. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळं रान मिळालं असल्याचं केशव उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधापुढे केंद्र सरकारने नमते घेत खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनाचा दुसरा डोस घ्यायला जर उशिरा झाला तर…’; संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती

दिवंगत आमदार रमेश वांजळेंच्या दोन्ही सख्ख्या मेव्हुण्यांचं कोरोनाने निधन

अजित पवारांना प्रमुख करणं म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे- गोपीचंद पडळकर

“देवेंद्रजी काय राव तुम्ही कधीही मदतीला पोहोचता, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना”

‘कोरोनामुळे आपण जवळची माणसं गमवलीत’; डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी झाले भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More