Top News महाराष्ट्र मुंबई

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना काहीच्या काही बिले आलीत. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. अशातच ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन त्वरीत खंडित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय म्हणजे नवी गाथा असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

माझं घर माझी सुरक्षा, माझे वीजबिल मलाच झटका, मंत्र्यांना गाड्या कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती, गोरगरीब मागती दिलासा तर त्यांच्या नशिबी मात्र आश्वासनाचा धत्तुरा, असं म्हणत उपाध्येंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली असल्याचंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

“पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…”

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या