बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

मुंबई |  पेगसॅस फोन टॅप प्रकरणामुळे देशातील वातावरण तापलं आहे. या प्रकरनावरून आज संसदेत गदारोळ झालेले पाहायला मिळाला. यावरून माजी केंद्रीय मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीचे सभापती शशी थरूर यांनी इस्रायलचे एनएसओच्या पेगॅससद्वारे 40 हून अधिक भारतीय पत्रकारांचे फोन हॅक केल्याचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी युपीए सरकारवर निशाणा साधला आहे.

9000 फोन आणि 500 इमेल खाती यावर काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या यूपीएमध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात नजर ठेवण्यात आल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केली आहे.

ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करत असल्याची टीकाही केशव उपाध्येंनी केली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता  माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, जगातील 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं असल्याच्या बातम्या 2019 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही- अमोल मिटकरी

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत”

“केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

‘…म्हणून गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाहीत’; रोहीत पवारांनी सांगितलं कारण

वेगवेगळ्या दुर्घटनेत मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल इतक्या निष्पाप नागरिकांचा बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More