Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असते. विविध मुद्द्यांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत असते. केतकीला (Ketaki Chitale ) दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे अटक देखील झाली होती. अशात तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
केतकीने थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका रॅलीत मुस्लिम कार्यकर्ते हिरव्या रंगाचा झेंडा तसंच मनोज जरांगे पाटलांचा फोटो घेऊन एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देताना दिसून येत आहेत.
केतकीची पोस्ट चर्चेत
केतकीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत मोठं आवाहन केलं आहे.”हातात कोणाच्या कठपुतळीचा फोटो आहे ते बघा. जातपात सोडा. हिंदूंनो, आपण जर एकत्र झालो नाही तर आपल्या घरासमोर हिरवळ दिसायला फार काळ लागणार नाही.”, असं केतकी म्हणाली आहे.
केतकीची (Ketaki Chitale ) ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. केतकीने यापूर्वी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीही केतकीनं तिच्या पोस्टमधून त्यांच्यावर टीका केली आहे. अशात तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
“..नाहीतर उद्या आपली पोरं अल्ला हू अकबर करू लागतील”
तसंच पुढे तिने (Ketaki Chitale ) लिहलं की, आपल्याला अशी हिरवळ बघायची नसेल तर जातपात सोडा. आपण विसरलो आहोत म्हणून यांचं फावतं आहे. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवा. धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा नाहीतर उद्या आपली पोरं अल्ला हू अकबर करू लागतील. जय हिंद”, अशी पोस्ट केतकीने केली आहे.
केतकीच्या या पोस्टवर आता नेटकरी देखील अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. केतकीची ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे. नेटकरी केतकीला आता सुनावताना दिसून येत आहेत.
News Title – Ketaki Chitale post went viral
महत्त्वाच्या बातम्या-
“लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं…”; ‘हिरामंडी’ फेम ‘या’ अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
“मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ मग आम्ही कोण?”; तृतीयपंथीयांचा सवाल
राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर
मोठी बातमी! शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना गांजा तस्करीत अटक
“मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं, नंतर..”; जरांगे पाटलांचा खासदार कोल्हे यांच्यावर हल्लाबोल