Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरते. केतकीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडीओत केतकीने थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तिने सरकारच्या एका निर्णयावर टीका करत सरकारचं वाभाडं काढलं आहे.
राज्यातील महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करताना केतकी चितळेने (Ketaki Chitale) एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यांनी मतही दिले नाही, त्यांना बळकट करण्यासाठी 10 कोटी दिले आहेत. तुम्ही बधीर झालाय का?, असा सवाल तिने सरकारला केलाय.
केतकी चितळेनं काढलं महायुती सरकारचं वाभाडं
देशात मोर्चे काढले जात असून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होत आहे. पण तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी दिले आहेत. तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का, हे ठरवलं आहे का?, असा सवालही केतकी चितळेने (Ketaki Chitale) केलाय.
तिघांच्या सरकारमधील एकजण परत काकाकडे जाणार आणि हातापाया पडत मला परत घ्या असे बोलणार. एक जण परत सरकार चालवायला येत नाही म्हणून तीन चाकांची रिक्षा चालवायला जाणार आणि एकजण राजीनामा देतोय पण तो राजीनामा घेतला जात नाही, अशी टीका केतकीने (Ketaki Chitale) केलीये.
Ketaki Chitale | “हिंदूच्या जमिनी वक्फ बोर्ड हडप करतील”
उद्या वक्फ बोर्डवाले तुमच्या घरी येतील आणि तुमच्या जमिनीवर दावा करेल, जमीन हडप करेल त्याविरोधात तुम्ही काहीच करू शकत नाही असे म्हणत वक्फ बोर्डाने घेतलेला निर्णय हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातही बदलता येत नाही असा दावा करत हिंदूच्या जमिनी वक्फ बोर्ड हडप करतील, अशी भीती तिने व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”
नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं
गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..
“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती