बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक झाली होती. काही दिवसांपुर्वीच केतकीला जामिन मिळाला होता. आता तिने अटकेत असताना तिच्यावर झालेल्या कथित अत्याचारांप्रकरणी माध्यमांना माहिती दिली आहे.

शरद पवार म्हणजे धर्म नाही, असं केतकी चितळेने म्हटले आहे. तसेच मी काही यमक जुळवून केलेली एक पोस्ट फेसबुकवर केली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस माझ्या दारात आले होते. त्यांनी मला अटक केली. या संपुर्ण गोंधळात 20 – 25 जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारले, शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले. माझ्यावर अंडी फेकण्यात आली. केवळ माझ्यावरच नाही तर हल्लेखोरांनी पोलिसांवर देखील हल्ले केले, असंही केतकी म्हणाली.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केतकी चितळे विरोधात 22 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तिला 14 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 24 जून रोजी तिला जामिन मंजूर झाला. मी सध्या एक पोस्ट करण्यात आलेल्या 22 एफआरआयविरोधात न्यायालयीन लढा देतेय. या 22 पैकी केवळ एका प्रकरणात मला जामीन मिळाला असून 21 प्रकरणे अजून बाकी आहेत, असे केतकी चितळेनं स्पष्ट केलं.

सार्वजनिक दुष्प्रचार, बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढविणे या प्रकरणांमध्ये केतकी चितळे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतली तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या पोस्टसाठी तुरूंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत. असंही केतकी म्हणाली.

थोडक्यात बातम्या – 

‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय

‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

बिलाची काळजी करू नका, बिंधास्त हॉटेलमध्ये जेवा; वाचा सविस्तर

पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More