मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे(Ketki Chitale) तिच्या बेधडक वक्तव्यामुळं नेहमीच चर्चेत येत असते. तिनं केलेल्या वक्तव्यामुळं बऱ्याचदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
नुकतेच केतकीनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळं केतकी आणि अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या होत्या की, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर काहींनी टीकाही केली होती.
आता अमृता यांच्या याच वक्तव्यावरून केतकीनं नाव न घेता अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे. तिनं इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जुनं आणि नवं यावरून जे काही समोर येत आहे ते जुनं झालं आहे. जसं की नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना झाला आहे.
भारत देश प्रत्येक सेंकदाला बदलत आहे. त्यामुळं आपणही स्वत:ला बदलण्याची वेळ आली आहे. सध्या तीन हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या करायची झाल्यास ती शंभर वर्षांची झाली आहे, असंही तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.