कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद’ केल्यास भीषण परिणाम! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा कंत्राटी कामगारांना सर्वोच्च प्राधान्याने सुविधा पुरवा
मुंबई| “कोरोना विषाणूशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या भितीपोटी उद्या जर मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद आंदोलन’ पुकारले तर त्यांचे भीषण परिणाम कोट्यवधी मुंबईकरांना भोगावे लागतील. अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ह्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना लिहिलं आहे.
असं घडू नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्वच्या सर्व कंत्राटी कामगारांना सर्वोच्च प्राधान्याने उत्कृष्ट गुणवत्तेचे मास्क, हातमोजे, गमबूट तसंच हॅंड सॅनिटायझर आणि इतर आवश्यक त्या वस्तू-सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी तसंच कंत्राटदार ह्यांना आदेश द्यावेत”, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ह्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात अशी विनंती केली आहे..
दुर्दैवानं, ह्या कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतन तर मिळत नाहीत, पण त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य त्या सुविधाही त्यांना पालिका प्रशासनाकडून आणि संबंधित कंत्राटदारांकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असा आरोपही केतन नाईक ह्यांना महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
“आवश्यक त्या वस्तू-सुविधांच्या अभावी कंत्राटी कामगार नाराज होणार नाहीत, त्यांचे मानसिक धैर्य ढळणार नाही, त्यांच्या शारीरिक आरोग्याला कोणताही धोका पोहोचणार नाही, ह्याविषयी पालिका प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घ्यावी”, हीच आमची एकमेव अपेक्षा असल्याचंही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ह्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती
जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर
महत्वाच्या बातम्या-
31 तारीख नाही तर पुढील आदेश निघेपर्यंत दिलेले आदेश पाळावेत- अजित पवार
आता मात्र कहरच झाला; दारू घरपोच पाठवा याचिकेतून केली मागणी
“उद्धव ठाकरेंच्या हृदयाचं ऑपरेशन तरीही ते राज्यासाठी योद्ध्याप्रमाणे लढत आहेत”
Comments are closed.