‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले
नाशिक | अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. केतकी चितळेने पोस्ट केल्याने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अखिल ब्राम्हण महासंघानेही केतकी चितळेच्या पोस्टवर टीका केली आहे. त्यातच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टिका केली आहे.
शरद पवारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. अशा लोकांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. अभिनेत्री अथवा कोणीही असो त्यांच्यावर कारवाई करावी. हे चीड आणणारे आहे. यामागे मनुवाद आहे का?, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कवितेमधून समाजाचं दु:ख मांडलं होतं. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून टिका करणे योग्य होणार नाही. पवारांच्या आजारावरही टिका केली आहे. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिवसभर काम सुरू केलं आहे. ते अतिशय चांगलं काम करत आहेत. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”
‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed.