पॅन कार्ड हरवताच केवीन पीटरसनची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव, म्हणाला…
नवी दिल्ली | इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन सध्या अडचणीत सापडला आहे. केवीन पीटरसन याचं पॅनकार्ड हरवल्याने त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
‘माझं पॅन कार्ड हरवलं आहे. मी सध्या प्रवास करत आहे पण मला कामासाठी प्रत्यक्ष कार्ड हवे आहे. कोणीतरी मला लवकर मदत करेल अशा व्यक्तीकडे पाठवू शकेल का?’, असं ट्विट करत पीटरसनने पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं आहे.
केवीन पीटसनने हिंदी आणि इंग्रजीमध्येही ट्विट केलं आहे. पीटरसनच्या या ट्विटला भारतीय आयकर विभागाने एक लिंक शेअर करत मदत केली. आयकर विभागाच्या प्रतिक्रियेनंतर पीटरसनने ट्विट करत आयकर विभागाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पॅन कार्ड हरवल्याने पीटरसनने थेट पंतप्रधान मोदींकडे धाव घेतली. केवीन पीटरसनचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
भारत कृपया मदद करें⚠️
मैंने अपना पैन कार्ड खो दिया है और सोम यात्रा कर रहा हूं लेकिन काम के लिए भौतिक कार्ड की जरूरत है।
क्या कोई कृपया मुझे किसी ऐसे व्यक्ति के पास भेज सकता है जिससे मैं अपनी सहायता के लिए यथाशीघ्र संपर्क कर सकूं?
cc @narendramodi 🙏🏽
— Kevin Pietersen🦏 (@KP24) February 15, 2022
प्रिय @KP24,
हम आपकी सहायता के लिए उपलब्ध हैं। यदि आपके पास अपना पैन विवरण है, तो कृपया भौतिक पैन कार्ड के पुनर्मुद्रण के लिए आवेदन करने की प्रक्रिया जानने के लिए इन लिंक पर जाएं: (1/2)https://t.co/M2RFFlDsCThttps://t.co/fySMs6nm62
— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 15, 2022
थोडक्यात बातम्या-
‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा
अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या तरूणाने केला खळबळजनक दावा
अमृता फडणवीसांनी राऊतांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मामी गप्प बसा’
‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या
“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”
Comments are closed.