धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई | सर्वाधिक प्रतिक्षेत असणारा दाक्षिणात्य चित्रपट ‘केजीएफ 2’ (KGF 2) प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. अभिनेता यशच्या (Yash) आयुष्यात केजीएफमुळं अनेक मोठे बदल झालेले पहायला मिळाले.
केजीएफ चॅप्टर 2 मध्ये संजय दत्त (Sanjay Datt), रविना टंडन (Ravina Tandon) अशी मोठी स्टारकास्ट असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडत होतं. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संजय दत्त या चित्रपटात अधिराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रविना टंडन राजकीय भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. संजय दत्तच्या खलनायक लुकची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपासून बाॅक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकुळ घातला आहे. जय भीम, असुरन, आरआरआर, या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.
पाहा व्हिडीओ –
थोडक्यात बातम्या –
रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध
नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
वाढत्या महागाईमुळे काॅंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…
“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न
“आंडू पांडूंनी माझा नाद करू नये”; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा
Comments are closed.