बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; भिडे पूल पाण्याखाली

पुणे | राज्यभरात पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. अशातच खडकवासला धरणातून गुरुवारी रात्री पाण्याचा मुठा नदीत विसर्ग वाढल्यानंतर डेक्कन येथील भिडे पुलापर्यंत पाणी आलं. त्यामुळे आता पुण्यातील डेक्कन परिसरात असलेला भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.

जोरदार पावसामुळे नदीतील पाणी पातळी वाढल्यामुळे डेक्कनमधील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असल्यानं जलपर्णी मोठ्या प्रमाणात पुलाखाली अडकली होती त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून, नदीपात्रातून होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळवण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.

खडकवासला धरण तुडूंबं भरल्यानं अवघ्या 7 तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग 2400 क्युसेकवरून 25036 पर्यंत वाढवत न्यावा लागलाय. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, भिडे पुलापर्यंत पाणी आल्याने कर्वेनगर, वारजे, कोथरुड, डेक्कन येथून शहराच्या मध्यवर्ती भागात नदीपातरातून येणारी वाहने महेंदळे गैरेजजवळील चौक व रजपूत झोपडपट्टी येथून वळविण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या – 

साताऱ्यातील पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; देवरुखवाडीत दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली पोस्ट, म्हणाली….

तरूणीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More