खडसे पवारांसोबत राष्ट्रवादीच्या मंचावर, चर्चांना उधाण

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच खडसे उद्या राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलंय. 

एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एकनाथ खडसेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

विशेष बाब म्हणजे भाजपचेच जिल्ह्यातील दुसरे नेते गिरीश महाजन यांना मात्र या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या