नागपूर महाराष्ट्र

खडसे साहेब… शिकार तुम्ही केली आणि डाव दुसऱ्याने हाणला- अजित पवार

नागपूर | खडसे साहेब… शिकार तुम्ही केली आणि डाव दुसऱ्याने हाणला, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे नेते एकनाथ खडसेंना चिमटे काढले. ते विधानसभेत बोलत होते.

आम्ही सत्तेत असताना राज्यावर असलेल्या कर्जावर भाजपवाले टीका करत होते, खडसेसाहेब काय काय शब्द वापरत होते? आता कर्ज दुपटीने वाढले, त्याचे काय करायचे? असंही ते म्हणाले.

विरोधक म्हणून खडसे टीका करत होते, त्यांनी वातावरण तयार केले. मात्र आता त्यांना बाजूला करण्यात आले आहे. शिकार तुम्ही केली आणि डाव दुसऱ्यानेच हाणला, असं ते यावेळी खडसेंना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-… अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही; खडसेंनी सरकारला खडसावलं

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या