महाराष्ट्र मुंबई

“भाजपच्या अनुकूल परिस्थितीत खडसेंनी पक्षाची साथ सोडू नये”

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. अनेकवेळा खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीष महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप प्रतिकूल परिस्थितीत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काम केलं आहे. त्यामुळे आता पक्षासाठी अनुकूल परिस्थिती असताना त्यांनी पक्ष सोडू नये, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. सरकारनामाशी ते बोलत होते.

दरम्यान, एकनाथ खडसेंची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…

‘चीनचं राहुद्या आधी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बाहेर काढुन दाखवा’; भाजप नेत्याचा गाधींना टोला

सुनेच्या विनयभंगाप्रकरणी भाजप नेत्याला अटक

राज्य सरकारला अमर, अकबर, अँथनीची उपमा देत टीका करणाऱ्या दानवेंना अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या