Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

अहमदनगर | 30 डिसेंबर 2020 रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचं समन्स मला मिळालं असल्याची माहिती भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांने आपलाही नंबर लागणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.

आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल, असं मदत आणि पुर्नवर्सन मंत्री काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच भाजपला हा धंदा खूप महागात जाईल, असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर आता दुसरा नंबर राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचा लागला आहे.

दरम्यान,  ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला त्याचदिवशी हे ईडीची नोटीस देतील पण तेव्हा मी सीडी दाखवेन, असं खडसे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल

सांगलीतील 16 लाखांचा बकरा गेला चोरीला!

अतुल कुलकर्णी ‘या’ मध्ये दिसणार हटके भूमिके

‘…तेव्हाच मी कोल्हापूरला जाईन’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं सिक्रेट मिशन!

…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या