बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वत:ला मोठा नेता म्हणे, तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झालात”

जळगाव | राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा (Election) प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. त्यामुळे राज्यभर जोरदार प्रचारसभा गाजताना देखील दिसत आहेत. अशातच आता जळगावात खडसे विरूद्ध महाजन (Khadse Vs Mahajan) आमने सामने आल्यानं चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय.

जळगावातील या दोन दिग्गज नेत्यांनी काही अंतरावरच प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर तसेच थोड्याच अंतरावर सभा घेत असलेल्या एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झालात, असं महाजन म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो आणि स्वत:च्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास झालाय, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. विकास मात्र भकास आणि स्वत:ला मोठा नेता म्हणे, असा टोला देखील महाजनांनी खडसेंना लगावला आहे. तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, आता तुम्ही कितीही आवाज चढवला तरी तुमची धार बोथट झालेली आहे. आता तुमचं काही खरं नाही. मला एकनाथ खडसेंनी मोठं केलं नाही तर मी जनतेचे प्रश्न सोडवून मोठा झालोय, असंही महाजन म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटात गंमत करून दाखवतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

भारतीयांसाठी धोक्याची घंटा! लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्राॅनचा धोका

“त्यांचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?”

“…त्यावेळी माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More