न्यायालयाचा एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दिलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार (Ncp Mla) आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने खडसेंना दिलासा आहे.

एकाच विषयाची इतक्या वेळेस चौकशी (Inquiry) करून देखील काहीही सापडत नसल्याने भोसरी भूखंड प्रकरणी असलेला एफआयआर रद्द करावा अशी मागणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी  न्यायालयाकडे केली होती. यावर न्यायालयाने खडसेंना दिलासा देणारा निर्णय दिलाय.

या प्रकरणात आता चार्ज शीट किंवा अटक करता येणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने देत एकनाथ खडसेंना मोठा दिलासा दिला आहे.

पुण्याजवळील (Pune) भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा एकनाथ खडसेंवर ते मंत्री असताना करण्यात आलेला. यामुळे तत्कालीन मंत्री खडसेंना आपल्यापदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.

हा भूखंड खडसेंनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते.

या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-