बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिवाळीत खानांचे चित्रपट रिलीज होतात आता या दिवाळीत स्वत: खान रिलीज झालेत”

मुंबई | मुंबईतील कथित क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा मागील 26 दिवस या प्रकरणामध्ये तुरूंगात होता. पण आज त्याची मुंबईच्या आर्थर कारागृहातून सुटका झाली आहे. त्यावर आता बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राम गोपाल वर्मा आपल्या रोखठोक मत प्रदर्शनासाठी सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी आता आर्यन खानच्या सुटकेवर ट्विटरवर एक मजेशीर टिप्पणी व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील खानांच्या चित्रपटांच्या रिलीजसाठी राखीव असते. मात्र यावर्षीच्या दिवाळीमध्ये स्वत:हा खान रिलीज झाले आहेत, असं मिश्कील ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.

आर्यन खान मागील 2 ऑक्टोबरला एनसीबीने क्रूझवर धडक कारवाई केल्यापासून काही दिवस एनसीबी कार्यालयात होता. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर शुक्रवारी सुटका करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने त्याची सुटका शनिवारी करण्यात आली आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या सुटकेनंतर शाहरूख खानच्या आप्तस्वकियांमध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच शाहरूखच्या मन्नत या निवासस्थानी विद्युत रोषणाई केली आहे. आर्यनच्या सुटकेनंतर मन्नत बाहेर त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या – 

देह त्यागिता कीर्ती मागे उरावी! जाता जाता पुनीत राजकुमार यांनी केलं ‘हे’ महान काम

‘येत्या डिसेंबरमध्ये शिवसेनेतील…’; नारायण राणेंचा मोठा दावा

“…म्हणून मला कधी मंत्री व्हावं वाटलं नाही”

“कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही, आता व्हायचं ते होऊ द्या”

“…म्हणून 2024ला मोदींची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी होणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More