बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खेसारीलालच्या नव्या गाण्यानं केला कहर, काही तासात 4 कोटी व्ह्यूज!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता खेसारी लाल यादव. या अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. खेसारीलाल हा एक भोजपूरी अभिनेता आहे. मात्र त्याची गाणी देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालतात. त्यामधील संगीत आणि त्याची नाचण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडते. अशाप्रकारे नुकत्याच आलेल्या त्याच्या नवीन गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

खेसारीच्या नवीन गाण्याचं टायटल ‘कोलगेट’ असं आहे.  हे गाणं अगदी दोन दिवसांपुर्वीच लोकांच्या भेटीस आलेलं आहे. मात्र केवळ दोनच दिवसात या गाण्याला 4 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत. या गाण्यामध्ये अभिनेत्री कनिष्का नेगीने काम केलं आहे. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून प्रेक्षक अगदी आवाक झाले आहेत.

गाण्यामधील कनिष्काचा अंदाज पाहिल्यानंतर तिला देखील देशभरातील लाखो लोक सोशल मिडीयावर फॉलो करतात आहेत. तसेच या गाण्यात दोन लोकप्रिय कलाकार एका धमाकेदार गाण्यावर काम करताना दिसत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्या हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या गाण्याला गेल्या 48 तासांत 4 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, हे गाणं रिलीज झाल्यानंतर अनेक यूटुबर्सनी देखील यावर अनेक व्हिडीओज, रिव्ह्यूज मांडले आहेत. या गाण्याच्या गायकाची विशेष बाब म्हणजे आजपर्यंत खेसारी लालने भोजपूरी सोडून इतर कोणत्याही भाषेत गाणं गायलेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता सहज मिळू शकतं!

अर्धशतकानंतर नितीश राणाचं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या विशेष कारण

“इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत, रोहित पवारांना कुठून मिळालं?”

आनंदाची बातमी!; महाराष्ट्रातील एक कोटी लोकांना मिळालं सुरक्षाकवच

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More