‘खिचडी’ शिजली, मात्र अफवांची; सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली | राष्ट्रीय खाद्य म्हणून खिचडीची घोषणा होणार असल्याचं वृत्त होतं. मात्र केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. 

4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर 800 किलोपेक्षा जास्त खिचडी शिजवून विश्वविक्रम करणार आहेत. त्यानिमित्ताने ही अफवा पसरली होती. 

मात्र या उपक्रमाचा उद्देश भारतीय खाद्याला जगभरात ख्याती मिळवून देणं हा आहे. खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषीत करणे नव्हे, असं आता समोर आलंय.