बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही त्याला माॅन्टी नावाने…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर मनसे नेत्याची भावुक पोस्ट

मुंबई | अभिनेता आणि ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांना सुन्न करुन सोडलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर भरभरुन सिद्धार्थबाबत पोस्ट शेअर केले जात आहेत. अशातच मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर सिद्धार्थच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थ आपल्या लहानपणीचा मित्र होता. मात्र, त्याचं नाव सिद्धार्थ असल्याचं तो प्रसिद्धीस आल्यानंतर समजलं, असं किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. सिद्धार्थला आम्ही माॅन्टी नावाने हाक मारत असायचो असं म्हणत सिद्धार्थच्या जाण्याने लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या असल्याचं शिंदेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सिद्धार्थ आपल्या शेजारच्याच बिल्डींगमध्ये राहत होता. त्याची उंची आणि तब्येत लहानपणापासूनच भारी होती. मोठेपणी त्याला अभिनय आणि माॅडेलिंगमध्ये रस निर्माण झाल्याचं शिदेंनी म्हटलं आहे. तसेच माॅन्टी अर्थातच सिद्धार्थ अतिशय खोडकर असून कोणाचीतरी खोड काढल्याशिवाय त्याला चैन पडत नसायची, मात्र अभिनय क्षेत्रात गेल्यानंतर तो शांत झाला असल्याचं देखील या पोस्टद्वारे त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, किर्तीकुमार शिंदेंनी नमूद केल्यानुसार स्वतः भांडणं काढणं, उंगल्या करणं हे सिद्धार्थचे छंद होते. सिद्धार्थची उंची होती मात्र व्यायामाने त्याने शरीर मिळवलं, त्यानंतर जाहिरात मिळू लागल्या आणि बिग बाॅस विजेता ठरल्यानंतर त्याने प्रसिद्धीचे शिखर गाठलं होतं, असं देखील किर्तीकुमार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा पीएफ खातेधारकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमेरिकेला ‘इडा’ चक्रीवादळाचा मोठा फटका; पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ

उद्धटपणा भोवला! राणू मंडलवर पुन्हा आली रस्त्यावर गाण्याची वेळ, पाहा ‘हा’ व्हिडीओ

‘…म्हणून चंद्रकांत पाटील यांची सीबीआय चौकशी करावी’; राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी

अदर पुनावाला यांची पुण्यात मोठी खरेदी; खरेदीची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More