‘मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून…’, खोक्या भाईचा व्हिडीओ व्हायरल

Khokya Bhosale Arrested

Satish Bhosale l शेतकऱ्यावर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Satish Bhosale Khokya Bhai) याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो शाळकरी विद्यार्थ्यांसमोर धमकीवजा भाषण देताना दिसत आहे. “मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे, आणखी एका केसने मला काही फरक पडत नाही,” असे तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

शिरूरमध्ये मारहाण आणि नवा व्हिडीओ :

काही दिवसांपूर्वी शिरूर येथे दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा आरोप खोक्या भाईवर आहे. बॅटने जबडा फोडण्याची ही घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच खोक्या भाईचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये तो विद्यार्थ्यांसमोर थेट धमकीची भाषा वापरताना दिसत आहे. तो म्हणतो, “सर काही करणार नाहीत, माझ्या हाताने काही होणार नाही, मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे.” तसेच, “माझ्यावर आधीच मोठ्या केसेस आहेत, आणखी एका केसने मला काही फरक पडत नाही,” असे तो म्हणतो.

Satish Bhosale l खोक्या भाईचा गुन्हेगारी इतिहास :

बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि शेवगाव येथे खोक्या भाईवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कलम 307 (Attempt to Murder) – 2021 मध्ये प्रयत्नात्मक खूनाचा गुन्हा
कलम 498A (Domestic Violence) – 2020 मधील कौटुंबिक गुन्हा
कलम 304 (Culpable Homicide) – 2020 मध्ये ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू
आर्म्स ॲक्ट (Illegal Weapons Case) – शस्त्र बाळगल्याचा गुन्हा

शिरूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा :

BNS 115(2) – प्राणघातक हल्ला (Attempt to Cause Death)
BNS 118(1) – जबरदस्तीने संपत्ती मिळवणे (Extortion)
BNS 189(2) – शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे (Threatening Government Officials)
BNS 190 – फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर (Fraud and Forgery)
BNS 191(2) – खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे (False Evidence)

खोक्या भाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “इतका मोठा गुन्हेगार खुलेआम धमक्या देत फिरतोय, मग बीड पोलीस काय करत आहेत?” असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

News Title: Khokya Bhai’s New Video Viral

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .